Thursday, August 26, 2010

भेटूया का?..


भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..
नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी

Wednesday, July 21, 2010

तुझे नी माझे नाते काय? …

तुझे नी माझे नाते काय? …
तु देणारी मी … मी घेणारा
तु घेणारी … मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चकाचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय ?….
तुझे नी माझे नाते काय? …
सुखदु: खाची होता व्रुष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येत टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
य मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय? …
नात्याला या नकोच नाव
दोघान्चही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघान्मधले काही!
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसयाचा पाय?
तुझे नी माझे नाते काय? …

Tuesday, June 29, 2010

Thursday, June 24, 2010

Sunday, May 2, 2010

माझ्याबद्दल थोडेसे...

नमस्कार मित्रहो,

मी सचिन अंभोरे, औरंगाबद्चा...

माझ्या मराठी ब्लोग वर आपले सहर्ष स्वागत आहे. मला प्रत्येकाशी काहीतरी शेअर करायला खुप आवडत म्हणून ब्लोग मुळे आणखी लिहायला लागलो. मी लिहिलेलं तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. भेटूच ब्लोग मध्ये..