Wednesday, April 27, 2011

आपण एकमेकाशी जोडलेलो तर असतो ना....!

शाळा, महाविद्यालय, याबरोबरच विद्यापीठाच्या विविध परीक्षा आता संपत आल्या आहेत, त्यामुळे जो तो आपापल्या कामात गुंतलेला आहे. ऊन चांगलेच तापायला लागल्याने वातावरणात चांगलीच उष्णता जाणवू लागली आहे. पण तरीही सुट्ट्या मध्ये काहीतरी करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे कोणी जॉब्स च्या शोधात आहे तर कुणी सुट्ट्यांचा एन्जोय करण्यासाठी पिकनिक ची तयारी करत आहे. पण परीक्षा संपली कि लगेच उन्हाळी शिबिरे, आणि विविध कॅम्प ची गर्दी होते. आणि अशातच मित्रांशी झालेली ताटातूट मनाला अस्व्स्त करते. कारण कोणी आपल्या गावी जातो किवा कोणी समर जॉब्स च्या कामात अडकतो. एकमेकांशी न होणारा संवाद मग मोबाईल वर होतो. एसेमेस, च्याटीग च्या दुनियेत प्रत्येकाचा तांत्रिक संवाद होतो. सहवासात घालवलेल्या ख्शानाना त्याची सर येत नाही. पण यानिमित्ताने का होईना आपण एकमेकाशी जोडलेलो तर असतो ना....!.मग आपणच ठरवूया कि यात प्रेम असावे कि नुसत्याच भावनांचा तांत्रीकपना....
सचिन एस. अंभोरे,
औरंगाबाद.

Sunday, March 27, 2011

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त थोडसे...

नमस्कार मित्रांनो,

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त थोडसे...

मराठी मातीशी बांधिलकी असल्याने आज असणार्र्या २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त थोडसे लिहावेसे वाटले म्हणून हे शब्दांचे तुम्हा कलारासिकांशी थोडेसे हितगुज... मित्रांनो मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग होतात... नाटकातून अभिव्यक्त होणारा अभिनय टीवी किवा रुपेरी पडद्यापेक्षा कितीतरी सकस आणि सशक्त असतो हे मराठी रंगभूमीने दाखवून दिले आहे. वी. वा. शिरवाडकर, विजय तेंडूलकर, चित्तरंजन कोल्हटकर, श्रीराम लागू, निळू फुले, शिवाजी साटम, प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी वामन केंद्रे, व मकरंद अनासपुरे यांनी रंग्भूमिवरूनच आपल्या कारकीर्दीचा ठसा उमटवला आहे. रंगभूमीला चांगले दिवस यावेत यासाठी राज्य सरकारनेही अनुदान जाहीर केले आहे, परंतु तरीही या महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग चार भिंतीच्या आतील छोट्या पडद्यात अडकला आहे याची मात्र खंत वाटते. नाट्य क्षेत्राला आज व्यावसायिक रूप जरी मिळाले असेल तरी मात्र यानिमित्ताने का होईना नव्या पिढीच्या युवकांनी नाट्य क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला हवे. अभ्यासपूर्ण नवनिर्मिती होऊन मराठी रंगभूमीवर चांगले प्रयोग होणे गरजेचे आहे. चित्रपट आणि नुसत्याच मालिका निर्मिती करण्याकडे वळलेला वर्ग नाट्य निर्मितीकडे पाठ फिरवू लागलाय आणि मराठी प्रेक्षक वर्गही हळूहळू रंगभूमीकडून दूर होत चाललाय. आता हे कुठेतरी थांबवण्यासाठी आजच्या नाट्यक्षेत्रातील युवकांनी गांभीर्याने विचार करायलाच हवा. कारण समाजातील वास्तव घटनेचे चित्र अभिव्यक्त होण्याचे रंगभूमी हेच एकमेव सशक्त माध्यम आहे. मग चला तर जाणीव ठेवूया, रंगभूमीला वाचवण्याची शपथ घेवूया...

सचिन एस. अंभोरे,
एम. सी . एन . न्यूज
औरंगाबाद.

Tuesday, March 22, 2011

’शहीदे आलम’ भगतसिंग

२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग(सप्टेंबर २७, १९०७ - मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीदे आलम’ असा किताब दिला जातो.एक लेखक, एक पत्रकार, एक काव्यरसिक, एक प्रतिभावंत, एक समाजवेत्ता, एक क्रांतिकारक, एक परखड तत्त्वज्ञानी, एक सहिष्णू विचारवंत, एक द्रष्टा, एक निग्रही देशभक्त अशी अनेक रुपे या महायोग्याचे जीवनचरित्र वाचताना दिसून येतात. अत्यंत ज्वालाग्रही पण अत्यंत शांत. अत्यंत निग्रही पण तितकेच हळवे. अत्यंत तडफदार पण उतावळे नाहीत. अत्यंत कणखर पण तरीही विनम्र. स्वातंत्र्य देवतेला सर्वस्वाचा नैवेद्य दाखवूनही निरीश्वरवादी राहिलेले. पुनर्जन्मावर विश्वास नसलेले पण तरीही पुन्हा याच देशात जन्माला येण्यास उत्सुक असलेले.जगात सर्वांत घोर पाप असेल तर ते म्हणजे गुलामी व दारिद्र्य असे ठामपणे सांगत देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतः:ला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.

भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते.सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक.ऑस्कर वाइल्ड्चे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांचे चरित्र, वॉल्टेर, रुसो,व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते.त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नामावली फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वा. सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी स्वा. सावरकर लिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनीन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

भगतसिंग हे एक पत्रकार होते व लेखकही होते तसेच उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लालाजींच्या मृत्यू नंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप','दुर्दशा','सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली होती.
SACHIN AMBHORE, AURANGBAD.

Sunday, February 27, 2011

सुरेश भटांची गझल

सुरेश भटांची गझल
तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
राहिले रे अजून श्वास किती
जीवना,ही तुझी मिजास किती
पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले
रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो!
कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला
हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही
उगिच बोलायचे, उगिच हासायचे

Sunday, February 13, 2011

एक प्रेम कथा.

एक प्रेम कथा.
-->
ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरच न टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.तिने कित्येक वेळेस त्याला म्हटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवटपर्यंत साथ दिली असती."आणि अचानक एके दिवशी चमत्कार झाला.कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.शेवटी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिला दिसू लागले.सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.तो चक्क आंधळा होता.तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.त्याने काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली

Thursday, February 10, 2011


वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहून पाठवा...
सचिन एस. अंभोरे, औरंगाबाद.

मराठ WAD